सोशल मीडियावर अफवांचे पेव केव्हा फुटेल याचा काही नेम नाही. अमेरिका इस्रायल इराण या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात पेट्रोल बंद होणार अशी अफवा पसरली. रात्री 11 ते 12 वाजताच्या दरम्यान झोपेतून उठून आपली वाहने घेऊन नागरिकांनी येवल्यातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं.