चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना कुठल्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचं उदाहरण एका व्हायरल व्हिडिओतून पुढे आलं आहे. चंद्रपूर शहरालगतच्या फुलझरी गावात वीजवाहिनी दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी पोहोचले असतानाच त्यांना वाघाचा वावर आढळून आला.