मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण ९१% भरले असून, २४ तासांत कोणत्याही वेळी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.