वसई पूर्वेतील नवजीवन परिसरातील लजिज हॉटेलवर पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक केला जात असल्याचे उघडकीस आले.या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच पेट्रोलियम कायद्यान्वये तीन जनावर गुन्हा दाखल केला आहे.