पुण्याच्या 21 वर्षीय वैष्णवी अडकरने ITF W100 टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत भारतीय टेनिस विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. 2009 नंतर W100 स्पर्धेच्या एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती सानिया मिर्झानंतरची पहिली भारतीय महिला ठरली. तिची ही कामगिरी भारतीय महिला टेनिससाठी आश्वासक ठरली आहे.