अकोला : व्हॅलेंटाईन डे निमित्त संपूर्ण आठवडाभर शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध प्रकारचे टेडी, ग्रीटिंग कार्ड्स, गिफ्ट आयटम्स, खेळणी तसेच संदेशांनी सजवलेल्या भेटवस्तूंच्या खरेदीसाठी युवक-युवतींनी दुकानदारांकडे मोठी गर्दी केली होती. व्हॅलेंटाईन वीकच्या समारोपदिनी आजही बाजारपेठेत आपल्या आवडीच्या वस्तू खरेदीसाठी तरुणाईची चांगलीच लगबग आणि गर्दी पाहायला मिळत आहे.