आज लोकसभेत वंदे मातरम् गीतावर महत्त्वाची चर्चा होणार आहे. दुपारी १२ वाजता पंतप्रधान मोदी या चर्चेला प्रारंभ करतील. वंदे मातरम्ला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही चर्चा होत असून, या गीतावरून महाराष्ट्रासह देशभरात राजकारण तापले होते, त्याचे पडसादही उमटले होते.