बकिमचंद्र चटोपाध्याय लिखित ' वंदे मातरम ' या गीताला आज दीडशे वर्षे पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने नाशिकच्या नांदगाव येथील व्ही.जे.हायस्कूल या शाळेत सामूहिक वंदे मातरम् घेण्यात आले..अतिशय शिस्तबद्ध व तालबद्ध करत विद्यार्थ्यांनी हे गीत गायले..वंदे मातरम हे बकिमचंद्र चट उपाध्याय यांनी १८७० च्या दशकात रचलेली कविता आहे. जी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत समाविष्ट आहे.. ही कविता भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणास्त्रोत बनली..आणि नंतर भारतीय राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारली गेली.