वर्ध्यातील मांडवा–वर्धा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांचे खड्ड्यात बसून आंदोलन. दिग्रस परिसरात नागरिकांचे खड्ड्यात बसून रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन. उमरी ते मांडवापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था असून जागोजागी खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त. मांडवा, बेलगाव, झाडगाव, दिग्रस व उमरी परिसरातील नागरिकांचा आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभाग. खड्ड्यांमुळे वाहनचालक, नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आंदोलनस्थळी महसूल, पोलिस प्रशासन दाखल.