मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या आझाद मैदान परिसरात दाखल झाला आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आझाद मैदान परिसरात असलेल्या आंदोलकांसाठी खाण्या पिण्याची सोय नाव्हती मात्र आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असा पवित्रा मनोज जरांगे पाटील यांचा असताना त्यांच्या सोबत आलेल्या आंदोलकांसाठी आता मराठा बांधवांकडून आंदोलनाच्या तिसऱ्या रात्रीपासून पिण्याचे पाणी आणि खाण्याची सोय करण्यात येत आहे. विविध जिल्ह्यातून गावकरी तसेच समाजसेवकांकडून आंदोलकांसाठी ट्रक भरून पिण्याचे पाणी, सुखा खाऊ, भेळ, बिस्कीट, राजगिऱ्याचे लाडू, फळ, चटणी भाकरी तसेच अनेक पदार्थ वाटप करण्यात येत आहेत. जवळ पास महिना भर पुरेन इतके राशन सुद्धा काही आंदोलकांनी आणल्याचे पाहायला मिळत आहे.