जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या देहूत दाखल होऊ लागल्या आहेत, संत तुकाराम महाराजांचं मुख्य मंदिर असलेल्या शिरा मंदिर परिसरात वारकऱ्यांच्या दिंड्या येऊ लागल्या आहेत. याच मंदिराला प्रदक्षिणा घालून वारकरी वारीची सुरुवात करतात.