काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. दडपशाही करणाऱ्या किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांसोबत काँग्रेस जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. महाविकास आघाडी असो किंवा इंडिया आघाडी, काँग्रेस नेहमी संविधानाचा आदर करत किमान समान कार्यक्रमावर भर देते, असेही गायकवाड यांनी सांगितले.