नागपुरात चालत्या मेट्रोमध्ये फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. शोलो प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचीही हजेरी होती. शोमध्ये नवोदित डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान करून मॉडेल्सनी मेट्रोच्या डब्यात रॅम्प वॉक केला. विविध फॅशन इन्स्टिट्यूट मधील नवोदित मॉडेलनी चालत्या ट्रेनमध्ये केलेला रॅम्पवॉक पाहून प्रवासी देखील थक्क झाले. सेलिब्रेशन ऑन व्हील या उपक्रमाअंतर्गत महामेट्रो शुल्क आकारून अशा कार्यक्रमाना परवानगी देत असते.