वसई-विरारमधील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी वसई जनशक्ती आघाडीच्या वतीने मनपा मुख्यालयावर मोर्चा काडून निदर्शन करण्यात आली आहेत. शहरात झालेली दुरवस्था, रस्त्यावरी खड्डे, पाणी टंचाई, वाढती घरपट्टी, यासह अन्य मागण्या घेवून हे आंदोलन करण्यात आले आहे. मनपा विविध करांमध्ये सातत्याने वाढ करत असताना नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा का मिळत नाहीत, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.