वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात झाली आहे. एकूण ११५ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात आहेत. अधिकारी, कर्मचारी, उमेदवार आणि प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असून, त्यांना बहुमताने निवडून येण्याचा विश्वास आहे. निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.