आंब्याचे उत्पादन घटल्याने वाशी मार्केटला आंब्याची आवक कमी झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मधून एप्रिल महिन्यात आंब्याच्या केवळ ३२ हजार पेट्या आल्या आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात हापूस आंब्याच्या १ लाख पेट्या वाशी मार्केटमध्ये येत असतात. कोकणातील एकूण आंब्याचे क्षेत्र 1 एक लाख 24 हजार 571 हेक्टर क्षेत्र इतके आहे. या वर्षी गुढी पाडव्याला देखील वाशीमार्केटला फक्त पाच हजार पेट्यांची आवक झाली. कोकणातील मुख्य बाजारपेठ म्हणून वाशी मार्केटची ओळख आहे. आवक कमी असल्याने वाशी मार्केटला आंब्याचे दर देखील जास्त आहेत.