चिपळूणमधील वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या कृषी व पशुधन प्रदर्शन महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 'राधा म्हैस' आणि 'राजा बैल' यांसारख्या दुर्मिळ प्रजातींसह विविध पशु, पक्षी आणि प्राण्यांनी सर्वांना आकर्षित केले.