महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यासाठी महत्त्वाचा रोपवे प्रकल्प जाहीर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला वासोटा किल्ला पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित, सुलभ आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प नियोजित करण्यात आला आहे.