पुण्याच्या भोरमध्ये नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वासुदेव रस्त्यावर आल्याचं पहायला मिळालं. सकाळच्या पारी हरीनाम बोलत, गळ्यात राष्ट्रवादीचं उपरण घालून.. वासुदेवांकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला. पहाटेच्या वेळी घराघरात जाऊन पांडुरंगावरील अभंग-गवळणी गात, मतदान करण्याचं वासुदेवांकडून आवाहन करण्यात येतंय.