महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरात शांकभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त फळभाज्या व पालेभाज्यांची आरास करण्यात आली. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जातो. आज पुजेवेळी पुजारी सेवक वर्गाच्या वतीने ही सजावट करण्यात आली. या उत्सवासाठी 300 किलो पालेभाज्या, फळभाज्या व शेंगवर्गीय भाज्या वापरण्यात आल्या. ही आरास नित्य वारकरी, पुजारी वर्ग, कर्मचारी सेवकरी वर्ग यांनी केली.