लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील भाजीपाला शेतीला पावसाअभावी मोठा फटका बसतो आहे. करपत चाललेली टोमॅटोची रोपे आणि भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकरी टँकर विकत घेऊन घागरीने पाणी देत आहेत.