जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सध्या भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या उत्पादनावर होत असून बाजारात आवक कमी-जास्त होत असल्याने दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. काही भाजीपाला दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे.