बीडमध्ये भाजीपाल्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांवरती आणखी एक संकट ओढावले आहे. यापूर्वी वादळी वाऱ्यासह गारपिटीने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अशातच भाजीपाल्यासह शेतीमालाचे भाव बाजारपेठेत घसरल्याने शेतकऱ्यांवर मेथी आणि इतर भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. बीड तालुक्यातील एक शेतकरी मेथीला भाव नसल्याने थेट गुरांना मेथी चारत आहेत. बाजारात मेथीच्या एका भेळ्याला फक्त 1 ते 2 रूपये किंमत मिळत आहे. यामुळे बाजारपेठेत नेण्यासाठी लागणारे गाडी भाडे सुद्धा निघत नाही.