इंधन दरवाढीचा परिणाम आता कृषी क्षेत्रावरही दिसून येत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक सिंचन आणि शेतीसाठी लागणाऱ्या विविध खर्चात वाढ झालीय. त्यामुळे भंडाऱ्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत.शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत भाजीपाल्यांच्या किमतींमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.