पुण्यातील कोथरूड परिसरात वाहनांची चोरी झाली आहे. वाहनांची चोरी करतानाचा CCTV समोर आला आहे. कोथरूड परिसरात असणाऱ्या एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाहन चोरीची ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.