मुंबई मंत्रालयासमोरून जाणारी ६५० mm ची पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन जेव्हा फुटली तेव्हा या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं. सध्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून कफ परेड आंबेडकर नगर इथल्या झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठा केला जातो.