छत्रपती संभाजीनगर शहरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडली आहे. बाबा पेट्रोल पंप ते रेल्वे स्थानक रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दानपेटी फोडून चोरी केली. रेल्वे स्थानकाच्या दिशेने दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडत रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले.