बाजारातून उधळलेली म्हैस थेट घराच्या छतावर पोहोचल्याची घटना कोल्हापूरच्या मुरगूड येथे घडली आहे. उधळलेल्या म्हशीने सुहास चौगुले यांच्या घराच्या टेरेस वरील सोलर पॅनेल आणि झाडांच्या कुंड्यांची मोडतोड केली. आठवडा बाजाराच्या दिवशी म्हैस उधळल्याने मुरगुड मध्ये गोंधळ उडाला होता.