सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात सावरवाड गावात स्फटिक लिंगाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्फटिक लिंगाला पाहाण्यासाठी पर्यटकांची पावले येथे वळताना दिसत आहेत. हिमालयातील स्पिती येथून हा स्फटिक आणण्यात आला असून ते हजारो वर्षे जुना असल्याचे म्हटले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्फटिक लिंग नेमके कसे आहे हे पाहाण्यासाठी भाविकांचीही गर्दी होत आहे.