भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील वडेगाव येथे एका शेतकरी पुत्राने लग्नसोहळ्यात अनोखी परंपरा जपत सर्वांचे लक्ष वेधले. राहुल पगरवार यांनी सजविलेला हार्वेस्टर स्वतः चालवत नवरीला घरी आणत हटके वरात काढली. गोंदिया जिल्ह्यातील भंबोडी येथील सलोनी हिच्यासोबत त्यांचा विवाह पार पडला. शेतीशी घट्ट नाळ जोडलेल्या राहुल यांनी आधीच असा निर्णय घेतला होता. शनिवारी सकाळी हार्वेस्टरवरून निघालेल्या वरातीचे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. या अनोख्या लग्नसोहळ्याची जिल्हाभर चर्चा रंगली असून शेतकरी संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला जात आहे.