कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार महादेव महाडिक हे त्यांच्या फिटनेस फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतात. वयाच्या 78 व्या वर्षी दाताने ऊस सोलून खातानाचा त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना येथील त्यांच्या कार्यालयातला हा व्हिडिओ आहे.