पीकअप टेम्पो चालक आणि आरटीओ अधिकारी यांच्यातला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. 1500 रुपयांचा ऑनलाईन दंड देऊनही, नगदी 1500 रुपये घेतल्याचा आरोप चालक या व्हिडिओत करतो आहे. हा व्हिडिओ लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर जवळचा असल्याचे सांगितले जाते आहे.