पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांमी मोठी कारवाई करत पिंपळे सौदागर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या जाळ्यात अडकलेल्या 7 तरुणींची सुटका केली आहे. पिंपळे सौदागर येथील आयकॉन बिल्डिंगमध्ये ‘द औरा थाई स्पा’ हे सेंटर सुरू होते,परंतु या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली प्रत्यक्षात अवैध वेश्याव्यवसाय चालवला जात होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून स्पा सेंटरमधून अवैध साहित्य जप्त केले.