पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांना लाजवेल असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रक्षक चौक परिसरात एक परदेशी नागरिक इव्हिनिंग वॉकसाठी फुटपाथवर चालत असताना फुटपाथवर येणाऱ्या दुचाकींमुळे त्याला अडचण निर्माण झाली. त्यामुळे त्याने चक्क वाहतूक नियमांचे धडे दुचाकीस्वारांना देत रस्त्यावरून खाली उतरण्याची विनंती केली.