शेगावच्या संत गजानन महाराजांचा 148 वा प्रगट दिन उत्सव साजरा करण्यात आला. राज्यभरात प्रगट दिनाचा गजानन भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळाला, सोबतच अमेरिकेतही गजानन महाराज भक्तांमध्येही प्रगट दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे.अमेरिकेतील अटलांटा प्रांतातील अल्फेरेटा येथील मंदिरात गजानन भक्तांनी प्रगट दिन साजरा केला.यावेळी 71 पदार्थांचा महाप्रसादही गजानन भक्तांना वितरित करण्यात आला.