अकोला जिल्ह्यातील हातरुण, लोणाग्रा, कंचनपूर, बदलापूर, मांजरी, अमानतपूर, ताकोडा, खडकी, भोळ, सांगवी आणि मोहाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्याचा निधी मंजूर असूनही काम सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गाव संघर्ष समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच PWD कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.