काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीतील घटक पक्षांसोबत युती करण्याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, काँग्रेस कोणत्यही महायुती घटक पक्षासोबत युती करणार नाही आणि आवश्यक असल्यास स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल. मात्र, वंचित बहुजन आघाडीसोबत स्थानिक पातळीवर चर्चेतून अनेक ठिकाणी युती होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.