काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर वापरा आणि फेका या धोरणावरून टीका केली आहे. महायुतीमधील आमदारांना निधी मिळत नाही आणि त्यांच्या फायली प्रलंबित आहेत, अशी कुजबुज असल्याचे त्यांनी म्हटले. निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत मतभेद वाढले असून, भाजप लवकरच घटकपक्षांना दूर सारून एकट्याने सत्तेत येईल, असा दावा वडेट्टीवारांनी केला.