विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील चंद्रपूर मनपातील अंतर्गत वाद टोकाला पोहोचला आहे. गटनेता निवडीवरून सुरू असलेल्या संघर्षात धानोरकरांनी वडेट्टीवार यांच्यावर नगरसेवक पळवल्याचा आरोप केला आहे. हा वाद मिटवण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आज नागपूरमध्ये दोन्ही नेत्यांशी बैठक घेऊन मध्यस्थी करणार आहेत.