विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन माणगाव न्यायालयाने फेटाळला आहे. महाड नगरपरिषदेच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्यासह २९ जणांवर गुन्हा दाखल आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गोगावलेंनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.