बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात पाण्यासाठी गावकऱ्यांना अनेक किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. 1 कोटी 34 लाखांची जलजीवन योजना या गावात राबवण्यात आली होती, मात्र ती अद्यापपर्यंत अपूर्ण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गावकऱ्यांनी तलावासाठी आंदोलन केलं.