अकोल्यात ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांनी घागर मोर्चा काढण्याची वेळ आली आहे, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आज ग्रामस्थांनी हा घागर मोर्चा काढला. अकोला जिल्हा परिषद कार्यालयावर हा मोर्चा धडकला होताय. पातूर तालुक्यातील भंडारज बुद्रुक येथे जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजनेतील भ्रष्ट्राचारामुळ नागरिक पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप वंचितने केलाय. संबंधितांवर गुन्हे दाखल करून पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी वंचितने केली आहे.