वाशिमच्या कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांनी प्रेत थेट ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून ग्रामपंचायतचा जाहीर निषेध केल्याची घटना घडलीये. मयत झालेल्या व्यक्तीला अग्नी देण्यासाठी गावात कुठेही स्मशानभूमी नसल्यामुळे याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतोय. या संदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी वारंवार गावात स्मशानभूमीची मागणी करूनसुद्धा गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायतला जाग आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मयत झालेल्या व्यक्तीचं प्रेत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच नेऊन ठेवलं.