पाणी मिळत नसल्याने हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगाव येथील नागरिकांनी झाडावर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करा, पाणी उपलब्ध करून द्या या मागणीसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आलं.