बुलढाणा जिल्ह्याच्या जनुना तसेच चिंचाळा गट ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील अनियमितता, दूषित पाणीपुरवठा, अपूर्ण कामे, वितरण व्यवस्थेतील भेदभाव तसेच आर्थिक गैरव्यवहाराच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांसह संघटनेने मेहकर पंचायत समिती मध्ये ठिय्या आंदोलन केले .