शासनाच्या टँकर मुक्त महाराष्ट्र व हर घर नल योजनेचा उडाला बोजवारा उडाला आहे. गावपाड्यांमधील नागरिकांच्या घशाला कोरड पडली असून विहिरी आणि बोरवेलने तळ गाठलाय. पाण्यासाठी महिलांना एक ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. नदी नाल्या काठी खड्डे खोदुन पाणी भरावे लागत आहे. नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे तर मुक्या जनावरांना चिखलातील सांडपाणी प्यावे लागत आहे. जव्हार मधील सहा गावातील अकरा पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होतोय. जव्हार तालुक्यात हर घर नल योजने अंतर्गत 78 योजनांना मंजुरी देण्यात आली पण गेल्या सहा वर्षात फक्त 6 योजना अंशतः चालू होऊ शकल्या. तर 72 योजनांवर 80% निधी खर्च काम मात्र 50% अपुर्ण असल्याचे दिसून येतेय. गंभीर पाणी टंचाईच्या समस्येकडे पाहता प्रशासनेने पाण्यासाठी सर्वसामान्य जनतेची होणारी पायपीट थांबण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याची मागणी होत आहे.