शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटले आहे, यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरोळ इथे आंदोलक पोलिसांत तीव्र झटापट झाली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात धनाजी चुडमुंगे बेशुद्ध पडले. आंदोलनातील काही युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.