यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील MSEB (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याचा ओली पार्टी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसुलीसाठी गेल्या असताना ऑन ड्युटीच या महिला अधिकाऱ्याने धाब्यावर ही पार्टी केल्याचं समोर आलं आहे. या पार्टीमध्ये मालखेड येथील एक अभियंताही सहभागी असल्याची माहिती आहे. गावातील एका जागरूक नागरिकाने हा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे MSEB च्या कार्यप्रणालीवर आणि कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे..