विरार पूर्व कन्या शाळेत माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी कुटुंबासह मतदान केले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक मतदारांची नावे चुकीच्या ठिकाणी असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. ठाकूर यांनी मतदार यादीतील या गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.