वसई-विरार महापालिका हद्दीतील विरार फाटा शिवमंदिरजवळ मुख्य पाणीपुरवठा पाईपलाईनचा एअर वॉल फुटला. यामुळे 20-25 फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेले. सकाळी 8.30 वाजता ही घटना घडली असून, पालिकेकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. कार्यकारी अभियंत्यांनी लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होईल असे सांगितले.